आमच्याविषयी

कोकण रंगभूमी

आपल्या महाराष्ट्राला नानाविध सांस्कृतिक लोककलांचा वारसा लाभला आहे. अर्थातच महाराष्ट्र हे लोककलेचे उगमस्थान आहे यात तिळमात्र शंका नसावी. महाराष्ट्रातील पुणे हे शहर संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखलं जात तर अशा या महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नानाविध लोककला आजही तितक्याच मनोभावे लोककलेला कोणताही काळिमा न लागता जपल्या जात आहेत.

धरतीच्या कुशीत वसलेल्या हिरव्या शालीसह , महाराष्ट्राच्या ६ प्रशासकीय विभागापैकी एक , ७ जिल्हे अन ७२० किमी. लांबीच्या किनारपट्टीसह निसर्ग सौदर्यतेने नटलेली परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अर्थात कोकण भूमी.

कोकण रंगभूमी तर्फे आपल्या कोकणच्या नानाविध कला सर्वाधिक जनमाणसांपर्यंत पोहोचविण्याचा अतोनात प्रयत्न असेल आणि कोणत्याही लोककलेला कलंक लागणार नाही याची दक्षतेने काळजी घेतली जाईल.